ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करत राहणं म्हणजे Overthinking होय. भूतकाळातील चुका किंवा भविष्याची चिंता यामुळे मन थकलेलं, ताणलेलं आणि नकारात्मक होते.
झोप नीट लागत नाही,मन सतत चिंतेत राहतं तसेच निर्णय घेणं कठीण होत जाते आणि आत्मविश्वास कमी होतो.
जेव्हा विचारांचा भडिमार सुरू होतो, तेव्हा काही क्षण विश्रांती घेणे गरजेचे असते. डीप श्वास घ्या, श्वासावर लक्ष केंद्रित करा.असे केल्याने मन शांत होऊन विचारांची गती कमी होण्यास मदत होते.
तुमचं मन जे काही विचार करतय ते कागदावर लिहून काढा. लिहिल्याने मन हलकं होतं आणि विचार स्पष्ट दिसून येतात. मनातील विचार एकदा बाहेर पडले की, मन हलके होते.
दिवसात एक ठराविक वेळ विचारांकरिता ठरवा. जसे की, दिवसातील १५ मिनिटे फक्त विचार करण्यास द्यावे, पण बाकीच्या वेळी स्वतःला अतिविचार करण्यापासून रोखा. हळूहळू मनाला मर्यादा घाला.
भूतकाळ सोडून आणि भविष्यकाळाचा विचार न करता असलेल्या क्षणाच विचार करून जगता आले पाहिजे. संगीत ऐका, बाहेर फिरला जा, मित्रांशी बोला आणि वर्तमानात जगायला शिका.
“मी हे करू शकतो”, “सगळं ठीक होईल” असे वाक्य मनाला सकारात्मक ऊर्जा देतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा.