ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोजच्या स्वयंपाकात तेलाचे थेंब, मसाले आणि अन्नाचे उडलेले डाग गॅसवर उडतात. काळानुसार हे डाग गडद होत जातात आणि गॅस मळकट दिसू लागतो.
१ चमचा बेकिंग सोडा आणि २ चमचे व्हिनेगर घेऊन एकत्र मिक्स करा. हे तयार केलेले मिश्रण डागांवर लावा आणि १० मिनिटांनी ओल्या कापडाने पुसून घ्या. गॅस चमकदार दिसेल.
अर्धा लिंबू घ्या आणि त्यावर मीठ शिंपडा. गॅसवर जिथे तेलकट भाग असेल तेथे लिंबू घासा.लिंबातील आम्ल आणि मिठाचा खडबडीतपणा डाग काढण्यास मदत करतो.
डिशवॉश लिक्विडचे काही थेंब गरम पाण्यात मिसळा.त्यात कापड भिजवून गॅस पुसा.तेल विरघळून गॅस स्वच्छ होईल.
थोडं नारळ तेल डागांवर लावा, ५ मिनिटांनी कोरड्या कपड्याने गॅसवरील डाग पुसा. जुने, घट्ट डागही निघून जातील.
दररोज गॅस वापरल्यानंतर ओला कपडा वापरून पुसा.आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग करा आणि स्टील स्क्रबरऐवजी मऊ स्पंज वापरा.