Siddhi Hande
अनेकदा कोणत्याही वेळेला उचकी येते. जेवतानादेखील उचकी येते.
उचकी लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता, गॅस, अति थंडी हे आहेत.
उचकी लागल्यावर लगेचच थंड पाणी प्या. पाणी पिताना नाक बंद ठेवा. त्यामुळे उचकी थांबेल.
जेव्हा उचकी येते तेव्हा थोडा वेळ श्वास रोखून ठेवा आणि नंतर दीर्घ श्वास घ्या.
कधीकधी गॅसमुळे उचकी येते. त्यामुळे एक चमचा तुपात चिमूटभर हिंग टाका. हे ताकात मिसळून प्या.
२-३ काळी मिरी आणि अर्धा चमचा साखर चावून खा. यामुळे उचकी थांबते.
घशाला बर्फ लावणे उचकी आल्यावर तुम्ही गळ्याला बर्फ किंवा थंड पाण्याची पट्टी लावू शकता. यामुळे उचकी थांबते.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.