Shruti Vilas Kadam
प्रत्येकालाच आपले केस जाड, मजबूत आणि सुंदर दिसावेत असे वाटते, परंतु बऱ्याचदा आपण नकळत अशा सवयी लावतो ज्यामुळे केसांचे नुकसान होते.
जर तुम्हालाही वारंवार केस गळण्याच्या त्रास होत असेल, तर या छोट्या चुका समजून घेणे आणि त्यावर काम करणे महत्त्वाचे आहे.
ज्यांचे केस लांब आहेत ते केस धुतल्यानंतर डोक्यावर टॉवेल बांधतात. असे करू नये. जर तुम्ही ओल्या केसांमध्ये टॉवेल बांधला तर तुमचे केस कायमचे कोरडे होऊ शकतात.
जर तुम्ही तुमचे ओले केस हाताने किंवा टॉवेलने जोरात घासले तर केसांची मुळे हळूहळू कमकुवत होऊ लागतील.
केस ओले असताना त्यांची मुळे खूप कमकुवत असतात. म्हणून, केस ओल्या असताना कंगवा करू नका. प्रथम त्यांना नैसर्गिकरित्या सुकू द्या.
जर तुम्ही केस ड्रायर वापरत असाल तर त्याच्या तापमानाची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही केस धुतल्यानंतर हेअर ड्रायर वापरत असाल तर हेअर ड्रायर जास्त हिट करु नका.
जर तुम्हाला ओले केस विंचरायचे असतील तर नेहमी रुंद दात असलेला कंगवा वापरा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.