Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात हवा दमट होत जाते. त्यामुळे केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
पावसाळ्यात बऱ्याच जणांचे केस कमकुवत होतात आणि खूप जास्त गळायला लागतात.
तसेच वय वाढल्यावर हार्मोनल बदल होतात आणि केस गळू लागतात.
तुम्हाला या कारणांमुळे केसांच्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर पुढील उपाय नक्की करून पाहा.
२ चमचे मेथी पूड गरम तेलात मिक्स करून आठवड्यातून दोनदा लावा.
आवळा खा. तसेच तुम्ही आवळ्याचे चूर्ण कोमट पाण्यात सकाळी घेऊ शकता.
कांद्याचा रस आणि एलोव्हेरा जेल केस धुण्यापुर्वी केसांना लावून घ्या.
ओले केस हाताने नॅचरल पद्धतीने सुकवा.