ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा तिच्या शरीरात अनेक बदल होत असतात. यातील सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे केस गळणे.
डिलीव्हरी नंतर स्त्रियांचे केस मोठ्या प्रमाणात गळतात. अशा परिस्थितीत, महिला अनेक प्रकारचे शाम्पू आणि तेल वापरतात.
डिलीव्हरी नंतर स्त्रीच्या शरिरामध्ये एस्ट्रोजन नावाचे हार्मेन कमी होते. त्यामुळे केसांचे गळणे चालू होते.
डिलीव्हरी नंतर आईचे लक्ष पूर्णपणे बाळावर असते. अशामध्ये केसांची देखरेख होत नाही.
मोहरी किंवा नारळाचे तेल लावा. या तेलाने केसांना चांगली मालिश करा.
आठवड्यातून दोनदा चांगल्या शाम्पूने केस धुवा. शाम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरा. यामुळे तुमचे केस सिल्की राहतील.
बऱ्याचदा महिलांना कामामुळे दोन दिवस केस विंचरता येत नाहीत. मग केस विंचरताना तुटतात म्हणून दररोज केस विंचरा.
तुमच्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे समाविष्ट करा. यामुळे केस गळणे देखील कमी होतील.