Dhanshri Shintre
नाकात वारंवार खाज येणे ही सवय असू शकते, तर काहींना हवामान बदलामुळेही त्रास होतो.
नाक खाजण्याची समस्या टाळण्यासाठी काही उपयुक्त उपाय आहेत, जे तुम्हाला दिलासा देतील आणि त्रास कमी करतील.
दररोज आंघोळीनंतर नाकात तूप किंवा मोहरीचे तेल टाकल्याने कोरडेपणा आणि खाज कमी होते.
एसीमध्ये झोपल्यावर नाक कोरडे पडते, त्यामुळे उठल्यानंतर तूप किंवा तेलाचे थेंब नाकात घालावेत.
खोलीतील कोरडे हवामान नाकात खाज निर्माण करते, त्यामुळे ह्युमिडिफायरचा वापर करून आर्द्रता टिकवणं फायदेशीर ठरतं.
पाण्यात पुदिन्याचे तेल घालून वाफ घेतल्यास नाक मोकळे होते आणि खाज येणेही कमी होते.
सकाळी रोज आले‑तुळशीचा चहा पिल्याने नाकातील ऍलर्जी दूर होते आणि प्रतिकारशक्तीही वाढते.
शरीर हायड्रेट ठेवा, दररोज ३‑४ लिटर पाणी प्यायल्याने नाक कोरडेपणा आणि खाज दूर राहते.
तुमच्या अॅलर्जीची कारणं ओळखा, जसे धूळ किंवा प्राणी, आणि त्यांच्यापासून शक्य तितके दूर रहा.