Saam Tv
पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते त्यामुळे सर्दी, खोकला , अॅलर्जी लगेच होते. मग डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागतात.ही काही आसने नियमितपणे केल्याने पावसाळ्यात तुमचे आरोग्य निरोगी, तंदुरूस्त आणि उत्साही राहण्यासाठी मदत होईल.
पावसाळ्याच श्वसनाता त्रास होण्याची शक्यता अधिक असते. हे प्राणायाम फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवते आणि श्वसनमार्गातील दोष दूर करते. पावसाळ्यात होणाऱ्या ऍलर्जीपासून बचाव करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे
हे श्वसनाचे सोप्पे योगासन आहे. या प्राणायणामुळे सायनसचा त्रास कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट होते. यामुळे मानसिक शांतताही मिळते.
ही दोन्ही योगासने पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी उत्तम आहेत. जेवणानंतर काही मिनिटे वज्रासन केल्याने पचन सुधारते.तर पवनमुक्तासन हे गॅस, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
पावसाळ्यात शरीर प्रचंड सुस्तावते. कामात उत्साहीपणा राहत नाही.सतत थकवा जाणवतो त्यासाठी सूर्य नमस्कार उत्तम पर्याय आहे. यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायू मजबूत होतात.
पावसाळ्याच्या गार वातावरणामुळे सर्दी, कफ, ताप यांसारख्या समस्या बळावतात. या प्राणायमामुळे शरीरात त्वरित उष्णता निर्माण ऊर्जा निर्माण होते आणि या समस्यांपासून आराम मिळतो.
या आसनामुळे छाती आणि फुफ्फुस ताणले जाते, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे होणाऱ्या दम्याच्या त्रासापासून आराम मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.