Saam Tv
आपल्या सर्वांनाच सफेद शूज घालायला प्रचंड आवडतात. पण काही दिवसातच हे शूज खराब होऊन जातात आणि आपल्याला वाटत यावरचे डाग आता केव्हाच जाणार नाही. पण काही सोप्या ट्रिक्समुळे हे डाग सहज निघू शकतात.
पांढऱ्या शूजना चांगल ठेवण्यासाठी वापरल्यानंतर शूजवर मळ साचण्याची वाट न पाहता आठवड्यातून एकदा तरी हलक्या ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करा.
कोमट पाण्यात डिशवॉशर टाकावे,चांगले मिसळूनत झाल्यावर कापड किंवा टुथब्रशच्या मदतीने घासून स्वच्छ करावा. खुल्या हवेत सुकवा.
बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि थोडे पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. ती शूजला लावून हलक्या हाताने ब्रशने किंवा मऊ कपडा घेऊन स्वच्छ करावा.
पांढरी जेल नसणारी डागांवर लावा. काही वेळाने ब्रशने घासून ओल्या कपड्याने पुसल्यास शूज पु्न्हा नव्यासरखे चमकू लागतील.
शूजच्या खालील रबराचा भाग काळा किंवा पिवळा पडला असेल तर नेलपॉलिश रिमूव्हर किंवा साध्या पांढऱ्या रबराने घासून देखील स्वच्छ करता येतो.
लिंबू नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो, त्यामुळे शूजवरील पांढरा डाग घालवण्यासाठी अर्धे लिंबू कापून त्यावर थोडे मीठ टाका आणि ते शूजच्या डागांवर चोळा सुकल्यावर ओल्या कापडाने पुसून घ्या.
बाजारात मिळणारे शूज स्टेन रिमूव्हर झटपट शूज स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. नायलॉन ब्रश, मायक्रोफायबर क्लॉथ आणि शूजचा दुर्गंध घालवण्यासाठी 'फूट फ्रेश' स्प्रे मिळतो. हे शूज खराब न करता वंगण, तेल आणि कडक डाग सहज साफ करते.
शूज थेट कडक उन्हात ठेवू नका, कडक उन्हात सुकवल्याने पांढऱ्या शुजवर पिवळे डाग पडतात. त्यामुळे सावलीत आणि मोकळ्या हवेत सुकवावे.