Manasvi Choudhary
सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो त्यासोबत संपूर्ण दिवसाचे नियोजन बिघडते.
सकाळी मोबाईल न पाहता तुम्ही या ५ गोष्टींनी दिवसाची सुरूवात करणे गरजेचे आहे.
रात्रभर आपले शरीर पाण्याविना असते. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी १-२ ग्लास कोमट पाणी प्या
सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उभे राहा यामुळे शरीराला व्हिटॅमिन-D मिळते
दिवसातील महत्त्वाची कामे एका कागदावर लिहून काढा. यामुळे गोंधळ उडत नाही आणि कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे मानसिक शांतता मिळते.
किमान ५ मिनिटे डोळे मिटून शांत बसा. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा आजच्या दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.