ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हॉटेल रुममध्ये छुपा कॅमेरा लावून लोकांचे खाजगी फोटो काढून त्यांचा गैरवापर केला जातो.
जर तुम्ही एखाद्या हॉटेमध्ये थांबणार असाल तर या सोप्या पद्धतीने तुम्ही हॉटेल रुममधला छुपा कॅमेरा शोधू शकता.
रुममधील सर्व लाइट बंद करा. आणि मोबाईलच्या टॉर्चने सगळीकडे नजर टाका. जर कॅमेरा असेल तर कॅमेराची लाल किंवा हिरवी लाइट दिसेल.
RF म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेंसीचा उपयोग करुन वायरलेस कॅमेराचा शोध लागू शकतो. यामुळे हॉटेलच्या रुममधील छुपा कॅमेराच्या सिग्नलचा सोध लावण्यात मदत करतात.
फोनमधील कॅमेरा अॅप उघडा आणि रुममधील इन्फ्रारेड लाइट्स शोधा. हिडन कॅमरा इन्फ्रारेड लाइट्स वापर करतात. जे फोनच्या कॅमेरामध्ये दिसते. याशिवय तुम्ही Wi-Fi देखील स्कॅन करा जर अज्ञात डिव्हाइस जोडले गेले तर ते हिडेन कॅमेरा असू शकतो.
छुपा कॅमेरा शोधण्यासाठी काही मोबाइल अॅप्स डिझाइन केले आहेत. हे अॅप्स फोनच्या सेन्सरचा वापर करुन कॅमेरा लेन्स शोधू शकतात.
रुममील, बल्ब, सजावटीच्या वस्तू, अलार्म, घड्याळे, स्मोक डिटेक्टर आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइसेस नीट तपासून पहा. जर यामध्ये तुम्हाला लेन्स दिसली तर तो कॅमेरा असू शकतो.