ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सतत लॅपटॉप समोर बसून डोळ्यांवर ताण येतो. म्हणू दृष्टी सुधारण्यासाठी आहारात या ड्राय फ्रुट्सचा समावेश करा.
बदाम व्हिटॅमिन ई ने समृद्ध असतात आणि ते डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवण्यास आणि एकूण आरोग्यास मदत करतात.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले अक्रोड वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशनपासून संरक्षण करतात.
काजूमध्ये झिंक, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात जे रेटिनाचे आरोग्य वाढविण्यास आणि दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
पिस्तामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात, जे डोळ्यांना हानिकारक निळ्या प्रकाशापासून वाचवतात.
मनुकामध्ये रेझवेराट्रोलसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. मनुकामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते.
अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए आणि के भरपूर प्रमाणात असतात, जे चांगली दृष्टी राखण्यास आणि डोळ्यांच्या इन्पफेक्शनपासून संरक्षण करतात.
सुक्या गोजी बेरी व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि झेक्सॅन्थिने समृद्ध असतात. ज्यामुळे मोतीबिंदू आणि वयानुसार दृष्टी कमी होण्याचा धोका कमी होतो.