Manasvi Choudhary
शरीर नुसतं बारीक असणं फायद्याचे नाही तर शरीराला सुडौल आणि आकर्षक बनवणे ही देखील एक कला आहे.
बारीक असण्यापेक्षा तुम्ही फिट आणि टोन्ड दिसणं महत्वाचे आहे यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
केवळ चालण्याने किंवा धावण्याने चरबी कमी होते, पण शरीराला आकार देण्यासाठी स्नायू घट्ट होणे गरजेचे आहे. यासाठी आठवड्यातून किमान ३ दिवस घरच्या घरी पुश- अप्स मारा.
आपल्या आहारात प्रथिनांची कमतरता असल्यास शरीर सैल होते अशावेळी आहारात मोड आलेली कडधान्ये, पनीर, अंडी किंवा डाळींचा समावेश करा.
साखर आणि मैदाचे पदार्थ आहारात कमी खाणे यामुळे पोटावर आणि कंबरेवरची चरबी वाढत नाही.
योगासनांमध्ये सूर्यनमस्कार हा सर्वात शक्तिशाली व्यायाम आहे. यामुळे शरीरातील प्रत्येक स्नायू ताणला जातो आणि शरीर लवचिक होऊन आकार घेते.
दिवसभरात ३-४ लिटर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते. तसेच, दिवसातून ७-८ तास शांत झोप घ्या.