Manasvi Choudhary
साडी किंवा ड्रेसवर परफेक्ट मॅचिंग ब्लाऊज निवडणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग ब्लाऊज घातल्याने तुमचा लूक उठून दिसतो.
सध्या मॅचिंगपेक्षा कॉन्ट्रास्टची जास्त फॅशन आहे. साडीच्या रंगापेक्षा पूर्णपणे वेगळ्या रंगाचा ब्लाऊज निवडा
साडीच्या काठाचा जो रंग असेल, त्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता यामुळे लूक उठून दिसतो
सिल्क, ब्रोकेड साडीवर रॉ-सिल्कचाच ब्लाऊज वापरा. कॉटन किंवा सिंथेटिक कापड ब्लाऊज निवडू नका.
शिफॉन्/जॉर्जेट या साड्या हलक्या असल्याने त्यावर सॅटिन किंवा वेलवेटचा ब्लाऊज रिच लूक देतो.
जर साडीवर खूप नक्षीकाम केलेली असेल तर तुम्ही त्यावर प्लेन ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता.
ब्लाऊजच्या खांद्याची शिलाई बरोबर खांद्यावर असावी, ती खाली उतरू नये. लग्नासाठी ब्लाऊज शिवताना मागील गळा थोडा खोल ठेवून त्याला लटकन लावल्यास लूक अधिक खुलतो.