Manasvi Choudhary
केसांमध्ये गजरा माळण्याची जुनी पद्धत आहे. भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून महिला केसांमध्ये गजरा माळतात.
केसांना गजरा लावण्याच्या ट्रेडिंग पद्धती कोणत्या हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
केसांचा अंबाडा बांधून त्यावर पूर्ण गजरा माळण्याची जुनी स्टाईल आहे. केसांचा घट्ट अंबाडा बांधून त्यावर गोल आकारात गजरा लावा.
अर्धचंद्र किंवा साईड गजरा स्टाईलमध्ये अंबाडा बांधल्यावर गजरा पूर्ण गोल न लावता फक्त अंबाड्याच्या एका बाजून लावा.
ज्यांचे केस लांब आहेत त्यांनी वेणी घालून त्यावर गजरा गुंडाळायचा आहे. वेणीच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत गुंडाळा.
जर तुम्हाला केस मोकळे ठेवायचे असतील, तर केसांचा वरचा भाग मागे पिन करून त्यावर गजरा आडव्या पद्धतीने लावा.
आजकाल 'मेसी बन'ची खूप फॅशन आहे. केस थोडे सैल सोडून मानेजवळ अंबाडा बांधला जातो आणि त्यावर गजरा सैलसर पद्धतीने माळला जातो.