Tea Powder Reuse: उरलेली चहाची पावडर पुन्हा कशी वापरता येईल? जाणून घ्या उपयुक्त घरगुती ट्रिक्स

Dhanshri Shintre

स्मार्ट उपाय

उरलेली चहाची पावडर टाकू नका, ती उपयोगी ठरू शकते; वापरण्याचे ८ स्मार्ट उपाय जाणून घ्या.

तांब्याची भांडी

ओल्या चहाच्या पावडरीने स्टील व तांब्याची भांडी घासल्यास गंज आणि डाग सहजपणे दूर करता येतात.

चहाची पावडरच्या धुरामुळे

कोरडी उरलेली चहाची पावडर जाळल्यास तिच्या धुरामुळे डास दूर पळतात आणि घर स्वच्छ राहते.

पोत सुधारतो

चहाची पावडर मातीत मिसळल्याने मातीचा पोत सुधारतो, झाडांना आवश्यक पोषण मिळते आणि सुपीकता वाढते.

फरशी पुसा

उकडलेली चहाची पावडर पाण्यात मिसळून फरशी पुसल्यास घरातील वास दूर होतो आणि घाणही साफ होते.

कपाट, शूजचा वास

सुक्या चहाची पावडर कापडात बांधून कपाट, शूज किंवा पिशवीत ठेवली तर ती नैसर्गिक वासशोषक म्हणून काम करते.

मुंग्यांची समस्या

जिथे मुंग्या किंवा कीटक असतात तिथे चहाची पावडर टाकल्यास ते नैसर्गिकरित्या दूर पळतात.

कोंड्याची समस्या

थंड झालेली उकळलेली चहाची पावडर केसांवर लावल्यास कोंड्याची समस्या कमी होते आणि केसांमध्ये नैसर्गिक चमक येते.

स्क्रब करु शकतो

उरलेली चहाची पावडर दही किंवा बेसनात मिसळून स्क्रबसारखी वापरल्यास त्वचा मऊ, स्वच्छ आणि उजळ होते.

NEXT: बुरशीपासून मुक्त राहण्यासाठी पावसाळ्यात गहू कसे साठवावे? जाणून घ्या टिप्स

येथे क्लिक करा