Dhanshri Shintre
पावसाळ्यात ओलावा वाढल्याने धान्यांमध्ये बुरशी पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो.
वर्षभराचे धान्य पावसाळ्यात खराब होऊ नये यासाठी योग्य साठवणूक आणि ओलावा टाळण्याचे उपाय करणे गरजेचे आहे.
घरात गहू साठवण्यापूर्वी त्याला कडक उन्हात चांगले वाळवून ओलावा कमी करा.
गहू साठवण्यापूर्वी स्वच्छ धुऊन कोरड्या आणि हवाबंद ड्रममध्ये व्यवस्थित ठेवावे.
पावसाळ्यात गहू बुरशीपासून बचावासाठी त्यात थोडा चुना मिसळून साठवू शकता.
ड्रमच्या तळाशी पेपर ठेवा, त्यावर चुना पावडरचा थर पसरवा आणि पुन्हा पेपरने झाका.
ड्रममध्ये चुना ठेवून कडूनिंबाची पाने टाका, नंतर सुती कापड ठेवून गहू साठवण्याची तयारी करा.
गहू भरल्यावर झाकण लावण्यापूर्वी खाली चुना, पेपर आणि कडूनिंबाची पाने ठेवून झाकण घट्ट बंद करा.