Manasvi Choudhary
अनेकदा दात दोनवेळा घासूनही स्वच्छ दिसत नाही ते पिवळे राहतात अशी समस्या अनेकांना उद्भवते.
दातांवरचा पिवळेपणा हे केवळ सौंदर्यच नाही आरोग्यासाठीही घातक आहे. यामुळे हिरड्या दुखणे, हिरड्या सुजणे, दातांमध्ये घाण साचणे या समस्या निर्माण होतात.
दातांवरचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही घरीच सोपा उपाय करू शकता तो म्हणजे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस याची पेस्ट दातांवर लावून नंतर तोंड धुवामी
मीठ हे नैसर्गिकरित्या दातांसाठी उपाय आहे. रोज सकाळी टूथपेस्टमध्ये थोडे मीठ मिसळून दात घासा.
केळ खाल्ल्यानंतर त्याची साल ही दातांवर घासा यामुळे दातांवरचा पिवळा थर कमी होण्यास मदत होईल.
संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि कॅल्शियम असते, जे दातांवरील बॅक्टेरियाशी लढते संत्र्याच्या सालीन दातांवर घासल्याने दातांवरचा पिवळा थर कमी होतो.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी १ चमचा नारळ तेलाने गुळणी करा यामुळे दात स्वच्छ होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.