Kitchen Hacks : घराच्या भिंतीवर पडलेले पेन-पेन्सिलचे डाग कसे साफ करावे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घराच्या भिंती

प्रत्येक घराच्या भिंतींवरील रंग किंवा वॉलपेपरमुळे घर अधिक सुंदर दिसते. पण जर भिंतींवर डाग पडले असतील, तर ते चांगले दिसत नाही.

Home Wall | GOOGLE

पेन-पेन्सिल

मुले अनेकदा पेन, पेन्सिल किंवा क्रेयॉन्सने घराच्या भिंतींवर चित्रे काढतात. यामुळे भिंतींवर डाग पडतात आणि घराचे एकूण सौंदर्य बिघडते.

Home Wall Cleaning | GOOGLE

कसे स्वच्छ करावे?

भिंतीला पुन्हा रंग दिल्यास डाग निघून जातील, पण जर तुमच्याकडे पुन्हा कलर देण्यास वेळ नसेल, तर तुम्ही काही पद्धती वापरून ते स्वच्छ करू शकता.

Home Wall Cleaning | GOOGLE

नेलपेंट रिमूव्हर

सर्वप्रथम, भिंतीवरील डाग नेल पॉलिश रिमूव्हरने स्वच्छ करा. कापसाच्या बोळ्यावर थोडे नेल पॉलिश रिमूव्हर घेऊन डागावर लावा आणि काही वेळ तसंच ठेवून द्या.

Nailpaint Remover | GOOGLE

पेस्ट बनवा

मग बेकिंग सोडा, सफेद टूथपेस्ट, लींबाचा रस, डिश लिक्विड आणि व्हिनेगर मिक्स करुन पेस्ट तयार करा.

Paste | GOOGLE

स्पंजने स्वच्छ करा

आता ही पेस्ट स्पंजवर घेऊन भिंतीवर चोळा. सर्व डाग निघून जातील.

Home Wall Cleaning | GOOGLE

कापडाने पुसून घ्या

भिंत स्वच्छ झाल्यावर, सुक्या कापडाने किंवा नॅपकिनने ती स्वच्छ पुसून घ्या.

Home Wall Cleaning | GOOGLE

भिंत चमकेल

अशा प्रकारे तुम्ही भिंत पूर्णपणे स्वच्छ आणि अगदी नवीन दिसणारी बनवू शकता.

Home Wall Cleaning | GOOGLE

कोणती भिंत स्वच्छ करायची?

वॉलपेपर लावलेल्या किंवा इतर प्रकारची फिनिशिंग असलेल्या भिंती या पद्धतीने स्वच्छ करू नका. ही पद्धत फक्त रंगवलेल्या भिंतींवरच काम करेल.

Home Wall Cleaning | GOOGLE

Latest Toe Ring Designs : महिलांच्या पायातील ट्रेंडिंग 5 जोडवी डिझाईन, पाहा फोटोज

Jodavi | GOOGLE
येथए क्लिक करा