ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांच्या जन्माच्या काही दिवसानंतर त्यांच्या बॉडीची तेल मालिश सुरु केली जाते. तेल मालिश केल्याने बाळांची हाडे आणि शरीर मजबूत होते.
मालिश केल्याने लहान मुलांच्या कपड्यांनासुध्दा वास येऊ लागतो. अनेकदा कपडे धुतल्यानंतरही तेलाचा वास येत राहतो. वास आल्यामुळे ते अजिबात चांगले वाटत नाही.
जर तुम्हीसुध्दा लहान बाळाची मालिश करत असाल आणि त्यांच्या कपड्यांवरील तेलाचा वास जात नसेल तर, काही टिप्स वापरुन तुम्ही तो वास घालवू शकता. जाणून घ्या.
सर्वात आधी पाणी गरम करुन घ्या. त्यात लिंबाचा रस आणि १ चमचा व्हिनेगर टाका.
तयार केलेल्या गरम पाण्याच्या मिश्रणात धुणाऱ्या कपड्यांना २ तासांसाठी भिजत ठेवा.
जेव्हा तुम्हाला वाटेल की कपडे चांगले भिजले गेलेत, तेव्हा ते डिटर्जेंट पावडर किंवा साबण लावून स्वच्छ धुवून घ्या.
लहान मुलांचे कपडे जास्त जोर लावून घासू नये, असे केल्यास कपडे खराब होऊ शकतात म्हणून कपडे हलक्या हाताने धुवावे.
धुवून झाल्यावर कपडे स्वच्छ आणि चांगल्या जागी सुकत टाकावे. जास्त उन्हाच्या ठिकाणी कपडे वाळत टाकू नये, कपड्यांचा रंग उडण्याची शक्यता असते.
कपडे जेव्हा पूर्णपणे सुतले जातील तेव्हा, हातावर बेबी पावडर घेवून कपड्यांवर लावा. बेबी पावडर लावल्यास कपड्यांना चांगला सुगंध येतो.
अशा पध्दतीने कपडे धुतल्यास कपड्यांवर येणारा तेलाचा वास निघून जातो आणि कपडे साफ होतात.