Surabhi Jayashree Jagdish
हिवाळ्यात स्वेटर जास्त वापरल्यामुळे त्यावर लहान-लहान गोळे येणं ही खूप सामान्य समस्या आहे. यामुळे स्वेटर जुना दिसू लागतो. योग्य पद्धत वापरली तर हे गोळे सहज काढता येतात आणि स्वेटर पुन्हा नव्यासारखा दिसू शकतो.
स्वेटर गादीवर ठेवा आणि हलक्या हाताने रेझर फिरवा. यावेळी जास्त प्रेशर देऊ नका, नाहीतर कापड कापलं जाऊ शकतं. फक्त गोळ्यांवरच ब्लेड चालवा.
मऊ ब्रिसल्स असलेला ब्रश घ्या. एकाच दिशेने हलक्या हाताने घासा. लहान गोळे निघून जातात आणि कापड सुरक्षित राहतं.
स्वेटरवर खूप गोळे असतील तर प्यूमिस स्टोन उपयोगी ठरतो. यावेळी हळूहळू आणि एकाच दिशेने फिरवा. पातळ कापड असेल तर याचा वापर करू नका.
चिकट टेप गोळ्यांवर हलक्या हाताने दाबा. लहान आणि सैल गोळे लगेच निघतात. पटकन गोळे काढायचे असतील तर ही पद्धत चांगली आहे.
बाजारात फॅब्रिक शेव्हर उपलब्ध असतात. हे मशीन सुरक्षित आणि सोपं असतं. महाग स्वेटरसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
स्वेटर नेहमी उलटा करून हाताने धुवा. वॉशिंग मशीनमध्ये टाकताना जाळीच्या पिशवी धुणं फायद्याचं आहे. यामुळे नवीन गोळे येणं कमी होतं.