Manasvi Choudhary
उन्हाळ्यात केसात कोंडा होण्याची समस्या सामान्य आहे मात्र अनेकदा केसांतील कोंड्यामुळे केस खराब व कोरडे होतात.
केसांतील कोंड्याच्या समस्यावर घरगुती उपाय नेमके काय करावे? हे यो वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
केसांना मेहंदी लावल्याने केसांतील कोंडा दूर होण्यास मदत होते. मेहंदी आणि पाणी ही पेस्ट मिक्स करून तुम्ही केसांना लावा आणि नंतर केस धुवा
नारळाच्या तेल केसांना लावल्याने केस मॉइश्चरायझ होतात आणि लिंबूमुळे केसांतील आम्लीय पणा कमी होतो. यामुळे नारळ तेल आणि लिंबू मिक्स करून केसांना लावा.
केस धुण्यापूर्वी तासभर आधी टाळूला दही लावा. आणि नंतर केस कोरडे होऊ द्या. दह्यामधील लॅक्टिक ऍसिड त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते आणि टाळूचे पोषण करते.
कडुनिंबात अँटीफंगल गुणधर्म असतात जो प्रभावीपणे कोंडाशी लढतो. कडुलिंबाचा रस थेट टाळूला लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.
मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा नंतर या मेथीच्या दाण्याची पेस्ट बनवून ती केसांना लावा. कोमट पाण्याने केस धुवा मेथीच्या दाण्यांमध्ये दाहक-विरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. जे कोंडा वर उपचार करण्यास मदत करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.