ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तीळ शरीराच्या कोणत्याही भागावर असु शकतात. संपूर्ण शरीरावर तीळ कुठेही असेल तरी काही समस्या येणार नाही पण चेहऱ्यावर असलेले तीळ चांगले दिसत नाही.
चेहऱ्यावर काहिकच ठिकाणी तीळ चांगले दिसतात. बाकी ठिकणचे तीळ टिकली सारखे दिसतात आणि त्यानी पूर्ण चेहऱ्याचा लूक वाईट दिसतो.
तीळ घालवण्यासाठी तुम्ही एक असरदार घरगुती उपाय करु शकता. त्याने तीळ लवकर जाण्यास मदत होईल.
लोक बऱ्याचदा पानासोबत चूना खातात पण, चूना तीळ घालवण्यास देखील मदत करतो. चुन्यात कॅल्शियम ऑक्साइड असते.
सर्वात आधी चूना घ्या आणि त्याला फोडा. फोडल्यानंतर त्याची पावडर बनवून घ्या.
आता चून्याला पाण्यात मिक्स करा आणि त्याची जाडसर पेस्ट बनवून घ्या.
रात्री झोपण्याआधी तयार केलेली चुन्याची पेस्ट चेहऱ्यावर लावून रात्रभर ठेवून द्या.
सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. असे दररोज ४ ते ५ दिवस करा.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्या घ्यावा.