Manasvi Choudhary
चेहऱ्यावर बारीक बारीक केस असतात ज्यामुळे तुमचा चेहरा नेहमी काळा दिसतो. त्वचेवरील अनावश्यक केसांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडते.
अनेकजण पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्यावरील नको असलेले केस काढतात. पार्लरमध्ये वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगने चेहऱ्यावरील केस काढली जातात मात्र यामुळे चेहऱ्यावरील त्वचेवर रॅशेस येतात.
चेहऱ्यावरील त्वचा संवेदनशील असते अशावेळी तुम्ही घरगुती काही टिप्सचा उपयोग करून चेहऱ्यावरील नको असलेले केस काढू शकता.
चेहऱ्यावर तुम्ही हळद, बेसन आणि दूध याची एकत्रित पेस्ट करून लावा ही पेस्ट सुकल्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा यामुळे चेहऱ्यावरील केस कमी होतील.
कच्च्या पपईची पेस्ट आणि हळद एकत्र करून १०-१५ मिनिटे मसाज करा.
चेहऱ्यावर घरगुती पद्धतीने फेसपॅक लावल्याने केसांसह चेहऱ्यावरची डेड स्किनसुद्धा निघते.
चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर त्वचेला थंडावा मिळण्यासाठी कोरफड जेल किंवा बर्फ लावा.