Surabhi Jayashree Jagdish
अनेक जण कानातील मळ काढण्यासाठी कापसाची काडी, आगपेटीची काडी किंवा हेअरपिन वापरतात. मात्र अशा वस्तू कानात घातल्याने आतील त्वचेला इजा होऊ शकते किंवा कानाच्या पडद्याला दुखापत होऊ शकते.
कानातील मळ मऊ करण्यासाठी काही प्रकारच्या तेलांचा वापर केला जातो. हे उपाय कसे करावेत, याबाबत डॉक्टर डॉ. ए. के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार काही पर्याय समजून घेऊया. मात्र, कानात कोणतेही द्रव टाकण्यापूर्वी कानाला संसर्ग, पडद्याला छिद्र किंवा पूर्वी शस्त्रक्रिया झाली असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ऑलिव्ह ऑइलचा वापर कानातील मळ मऊ करण्यासाठी केला जातो. या तेलाचे काही थेंब कानात टाकल्याने मळ सैल होण्यास मदत होऊ शकते. मात्र तेल गरम करून कानात टाकू नये आणि वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लसणाच्या काही पाकळ्या ऑलिव्ह ऑइलमध्ये गरम करून लसणाचे तेल तयार केलं जातं. काही जण हे तेल कानातील मळ मऊ करण्यासाठी वापरतात. मात्र घरच्या घरी तयार केलेलं लसणाचं तेल कानात टाकल्याने जळजळ किंवा त्रास होऊ शकतो.
नारळाच्या तेलामुळे कानातील मळ काही प्रमाणात मऊ होऊ शकतो. मात्र हे तेल कानातील संसर्ग टाळतंच असं नाही आणि प्रत्येकासाठी ते योग्य ठरेल असंही नाही. कानाच्या बाहेरील भागाची स्वच्छता मऊ कापडाने करावी आणि कानाच्या आत तेल किंवा इतर वस्तू घालू नयेत.
बदामाचं तेल कानातील मळ मऊ करण्यासाठी वापरलं जातं. मात्र तेल कोमट करून कानात दोन ते तीन थेंब टाकणं किंवा कापसानं कान बंद करून २० ते ३० मिनिटं ठेवणं ही पद्धत सर्वांसाठी सुरक्षित नसतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.