ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुडघ्यांवर मळ जमा झाल्यामुळे गुडघे काळे आणि खराब दिसू लागतात.
गुडघे काळपट दिसल्यामुळे मुलींना शॉर्ट ड्रेस घालण्यास विचित्र वाटू लागते.
जर तुमचे गुडघे देखील काळपट पडले असतील तर काही घरगुती उपायांचा वापर करु शकता.
कोरफड हे त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते. कोरफडीच्या गरात थोडी हळद मिक्स करा. तयार केलेली पेस्ट गुडघ्यावर लावून मसाज करा.
जेव्हा पेस्ट सुकली जाईल तेव्हा, पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. ही पेस्ट काही दिवस तुम्ही रोज दोन टाईम लावा. असे केल्यास गुडघ्यांवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते.
बटाट्यामधील स्टार्च त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतो. बटाटे अर्धे कापून घ्या.
गुडघ्यांवर बटाटा घासा. त्यातून निघणारे पाणी तुमच्या त्वचेचा रंग उजळवेल.
थोड्या वेळाने, गुडघे पाण्याने धुवा आणि स्वच्छ करा. हे नियमितपणे १५ दिवस करत राहा.