Manasvi Choudhary
डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे ही समस्या महिला व पुरूषांसाठी सामान्य आहे. दररोजच्या जीवनशैलीत बदल झाल्यास डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात.
अपुरी झोप, सतत मोबाईल पाहणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ही डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची मुख्ये कारणे आहेत.
डोळ्याखाली काळी वर्तुळे आल्यास घरगुती उपाय तुम्ही करू शकता. यासाठी कोणत्याही क्रिमची किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज लागणार नाही.
लसूण हे आयुर्वेदिक आहे. लसणात हे दाहक- विरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असल्याने त्वचेची जळजळ कमी करते यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.
डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी झोपेचे वेळापत्रक महत्वाचे आहे. जर तुम्ही उशिरा झोपला आणि लवकर उठलात तर तुमच्या डोळ्या खाली काळी वर्तुळे येतात.
मोबाईक किंवा लॅपटॉप पाहण्याचा स्क्रिन टाईम कमी करणे यामुळे देखील डोळ्यांना त्रास होतो.
डोळ्याखालील त्वचा ही नाजूक असते यामुळे कोणत्याही केमिकल युक्त प्रसाधनांचा वापर त्वचेवर करू नका यामुळे त्वचेवर सुरकुत्या, त्वचा जळजळ होते.
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर थंड पाणी शिंपडल्याने देखील डोळ्यांना आराम मिळतो व त्वचा चमकण्यास मदत होते.