Manasvi Choudhary
काकडी खायला अनेकांना आवडते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण काकडी आवडीने खातात. डाएटसाठी काकडी सॅलड बेस्ट ऑप्शन आहे. मात्र अनेकदा काकडी कापल्यानंतर ती खाताना कडवट लागते.
काकडी कडू लागल्याने तोंडाची चव बदलते यामुळे कडू काकडी आपण फेकून देतो यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
काकडी कडू असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील कुकुरबिटासिन नावाचे घटक. जे कीटक आणि प्राण्यांपासून संरक्षण करते. काकडीच्या देठाकडील भाग अधिक कडवट असतो.
काकडीचा देठाकडील भाग म्हणजेच टोक कापून टाका. कापलेल्या भागावर थोडे मीठ लावा आणि गोलाकार फिरवा. रगडताना पांढरा फेस येईल ज्यामुळे काकडीचा कडूपणा कमी होईल.
काकडी सोलताना पातळ सोलू नका. काकडी गडद हिरवी असेल तर ती अधिक कडू असते अशावेळी तीची साल जाडसर असते यामुळे साल जाडसर काढा.
काकडी सोलण्यापूर्वी साधारण १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा म्हणजे काकडीतील कडूपणा कमी होतो.