Manasvi Choudhary
येत्या २५ जुलैला म्हणजेच शनिवारी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मातील महत्वाच्या एकादशीपैंकी आषाढी एकादशी आहे.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची मनोभावे पूजा केली जाते. अनेकजण या दिवशी उपवासाचे व्रत करतात.
तुम्ही देखील आषाढी एकादशीचा उपवास करणार असाल तर ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
बाजारातील फराळापेक्षा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात तुम्ही चविष्ट शेंगदाण्याचे लाडू ही रेसिपी ट्राय करा.
शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे, गूळ, वेलची पावडर, साजूक तूप, ड्रायफ्रुट्स हे साहित्य एकत्र करा.
लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढईमध्ये शेंगदाणे खमंग भाजून घ्या. शेंगदाणे कुरकुरीत भाजा.
शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर त्याची साल काढून घ्या.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची बारीक पेस्ट करा.
नंतर या शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये बारीक चिरलेला गूळ आणि वेलची पावडर मिक्स करा. संपूर्ण मिश्रण पुन्हा बारीक करा.
लाडूचे तयार मिश्रण एका मोठ्या प्लेटमध्ये काढा. त्यात साजूक तूप आणि ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे मिक्स करा.
हाताला थोडे तूप लावून मिश्रणाचे गोल-गोल लाडू वळून घ्या.