ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना च्यूइंगम खाण्याची सवय असते.
अनेकवेळा च्यूइंगम केसांना किंवा कपड्यांना चिकटतं.
तुमच्या कपड्यांवर च्यूइंगम चिकटल्यामुळे कपडे खराब होऊ शकतात.
कपड्यालरील चिकटलेलं च्यूइंगम काढण्यासाठी सोप्या ट्रिक्स करा फॉलो.
कपड्यावरील चिकटलेलं च्यूइंगम काढण्यासाठी बर्फाचा वापर करा. च्यूइंगम चिकटलेल्या जागेवर बर्फ चोळा यामुळे च्यूइंगम लगेच निघेल.
कपड्यावरील चिकटलेलं च्यूइंगम काढण्यासाठी तुम्ही नेल पॉलिश रिमुवरचा वापर करु शकता. त्यामधील अॅल्कोहॉल आणि प्रायमर च्यूइंगम काढण्यास मदत करते.
कपड्यावरील चिकटलेलं च्यूइंगम काढण्यासाठी तुम्ही डिटर्जंटचा वापर करू शकता त्याच्या वापरामुळे च्यूइंगम सोप्या पद्धतीनं निघेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.