Manasvi Choudhary
जास्त वेळ मोबाईल आणि स्क्रिन पाहिल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो.
डोळ्याभोवती दुखणे, अंधुक किंवा दुहेरी दिसणे, डोकेदुखी, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे सुजणे हे समस्या होतात.
डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी हाताचे दोन्ही तळवे एकत्र चोळून डोळे झाकून घ्या.
हा व्यायाम दररोज केल्यास डोळ्यांचा थकवा दूर होण्यास मदत होतो.
डोळे सलग गोलाकार फिरवावे लागतात. पहिल्या 10 वेळा डोळे क्लॉकवाईज तर नंतर 10 वेळा अँटी क्लॉकवाईज डोळे फिरवायचे असतात.
डोळे मिचकावणे, डोळे फिरवणे, आणि दूरच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करणे यासारख्या व्यायामामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
दिवसातून ३ वेळा, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, काही मिनिटे डोळे मिटून बसल्याने डोळ्यांना आराम मिळतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या