Beauty Tips : हात-पायांवरील नकोसे केस कमी करण्यासाठी घरच्या घरी करा हे उपाय

Saam Tv

पार्लरमधले वॅक्सिंग

बारीक सारीक केस सौंदर्यात बाधा आणतात. विशेषत: स्त्रीयांना याचा त्रास होतो. काहींना ते चांगले वाटतात, तर काही त्यांना काढण्यासाठी दर महिन्याला पार्लरच्या चकरा मारतात. वॅक्सिंगच्या त्या केमिकल्समुळे त्वचेची हळू हळू हानी होत जाते.

HAIR WAXING | PINTREST

घरीच पार्लर

काही घरगुती उपाय करून त्वचेची वाट न लावता पार्लरच्या फेऱ्या न मारचा घरीच पार्लरसारखी वॅक्सिंग करू शकता.

HAIR WAXING | PINTREST

ओटमील व केळं

ओट्सच्या जाडसर पीठात पिकलेले केळे स्मॅश करावे. पॅक थोडा सुकल्यानंतर चेहऱ्याला १५ मिनिटे मसाज करून लावा. कोरडा झाल्यावर उलट दिशेने खेचा.

OATMEAL AND BANANNA | PINTREST

हळद आणि बेसन

२ चमचे बेसन,चिमुटभर हळद आणि दूध किंवा गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा . पॅक चेहऱ्यावर सुके पर्यंत असू द्यावे. सुकल्यानंतर उलट दिशेने काढा.

TURMURIC AND GRAM FLOUR | PINTREST

साखर लिंबू आणि मध

साखर,मध आणि लिंबाचा रस एकत्र करून हलके वितळेपर्यंत गरम करा. थंड झाल्यावर लावा आणि कॉटन स्ट्रिपच्या मदतीने काढून घ्या. यामुळे बारीक केसही सहज निघून जाते.

SUGAR HONEY LEMON HAIR WAXING | PINTREST

पपई आणि हळद

कच्च्या पपईचा गर आणि चिमूटभर हळद मिसळून १५ - २० मिनिटे त्वचेवर ठेवा. नियमित वापर केल्यास केसांची वाढ मंदावण्यास मदत होते.

PAPAI AND TURMERIC | PINTREST

अंड्याचा पांढरा भाग

अंड्याचा पांढरा भाग, कॉर्नफ्लॉवर आणि साखर मिसळून मास्क तयार करा. १० मिनिटे चेहऱ्यावर असू द्या. सुकल्यावर हळूवार काढा.

EGG WHITE PART | PINTREST

नियमित मॉइश्चरायझिंग

केस काढल्यानंतर अॅलोवेरा जेल किंवा इतर प्रकारच्या मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ राहते आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

HAIR WAXING | PINTREST

पॅच टेस्ट

काहींच्या त्वचेवर या घरगुती उपायांचा देखील घातक परिणाम होऊ शकतो, त्यामुळे कोणताही पॅक वापरण्यपुर्वी छोट्या भागवर पॅच टेस्ट करून पहा.

HAIR WAXING | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Beauty Tips : नाकावरील ब्लॅक अन् व्हाइट हेड्स जात नाहीत? 'या' 5 टिप्स करा फॉलो

BLACKHEADS AND WHITEHEADS REMOVING TRICKS | CHATGPT
येथे क्लिक करा