Manasvi Choudhary
जाड मांड्यामुळे महिलांना संकोच वाटतो यामुळे महिला व मुलींना शॉर्ट कपडे परिधान करता येत नाही.
जाड मांड्या कमी करण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. जिममध्ये व्यायाम करतात मात्र फारसा फरक दिसत नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत त्या तुम्ही फॉलो करा.
मांड्यावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला आहारात देखील बदल करणे महत्वाचे आहे.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त पाणी साठू शकते यामुळे शरीराला सूज येते. मांड्यावरील शरीराचा आकार बदलू शकतो यामुळे तुम्ही मीठाचे सेवन मर्यादित करा.
जास्तीत कॅल्शियम, मॅग्नेशियमयुक्त भाज्यांचा आहार समावेश करा. केळी, दही आणि हिरव्या पालेभाज्या याचे सेवन करा.
कार्बोदकाचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर होते. जे नंतर पाण्यासोबत यकृत आणि स्नायूंमध्ये साठते यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते.
प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पोट बराच वेळ भरलेले राहते यामुळे भूक लागत नाही.
व्यायाम करताना शरीराच्या खालच्या भागांवर लक्ष केंद्रित करा यामुळे मांड्यावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.