Surabhi Jayashree Jagdish
तुम्हाला साखरेची क्रेविंग होते का? अशावेळी चॉकलेट, पेस्ट्री किंवा इतर गोड पदार्थ खाण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांना प्राधान्य द्या. केळी किंवा बेरीज खा, कारण हे साखरेची क्रेविंग कमी करण्यात उपयुक्त ठरतात.
आपण साखर आणि मीठाशिवाय जेवणाची कल्पना करू शकत नाही. साखर शरीराला मोठं नुकसान पोहोचवते. जर तुम्हाला डाएटमधून शुगर कमी करायची असेल तर हे स्मार्ट उपाय नक्की वापरून पाहा.
जर तुम्ही शुगरी ड्रिंक्स पित असाल तर त्यांना आहारातून लगेच काढून टाका. कारण यात असलेली साखर आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. याशिवाय पॅकेज्ड फ्रूट ज्यूस पिणंही टाळा.
जर तुम्ही बाजारातून ब्रेड विकत घेत असाल तर त्यातील शुगर सोर्स तपासा. यात फ्रुक्टोज किंवा सिरप असतात. त्यामुळे खरेदी करताना लेबल नक्की तपासा.
तुम्हाला साखरेची क्रेविंग होते का? अशावेळी चॉकलेट, पेस्ट्री किंवा इतर गोड पदार्थ खाण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांना प्राधान्य द्या. केळी किंवा बेरीज खा, कारण हे साखरेची क्रेविंग कमी करण्यात उपयुक्त ठरतात.
जर तुम्ही चहा किंवा कॉफी साखरेशिवाय पिऊ शकत नसाल तर जायफळ किंवा हेजलनटसारखे नैसर्गिक फ्लेवर्स वापरा. यामध्ये असे गुणधर्म असतात जे चहा-कॉफीचा कडवटपणा कमी करतात.
जर तुम्ही नियमितपणे किंवा दोन-तीन वेळा चिप्स-बिस्किट खात असाल तर ही सवय त्वरित बंद करा. याऐवजी कुरमुरे, धान्याचे क्रॅकर्स किंवा रोस्टेड ड्रायफ्रूट्स खा.
साखरेची क्रेविंग झाल्यावर स्वतःला थांबवणं कठीण असतं. पण नाही म्हणणं आवश्यक आहे. जर कोणी तुम्हाला गोड पदार्थ ऑफर करत असेल तर त्याला नकार द्या. तुम्ही घरच्या घरी खजूर किंवा नट्सपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता.