ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जवळजवळ प्रत्येक घरात भाज्या मसाल्यांसोबत शिजवून खाल्ल्या जातात. जेवण करताना भाजी खूप खारट किंवा मसालेदार होणे ही गोष्ट काही नवीन नाही.
कधीकधी भाजीमध्ये जास्त मसाला पडला जाते. अशा वेळी, प्रत्येकजण तिखट भाजी खाऊ शकत नाही आणि त्यामुळे भाजीची चवही बिघडते.
जर तुमच्या पदार्थात चुकून जास्त लाल मिरची पावडर पडली, तर काही पदार्थांच्या मदतीने तुम्ही त्याचा तिखटपणा कमी करू शकता.
ग्रेव्हीवाल्या भाज्यांमध्ये तिखटपणा जास्त झाला तर, त्यात बटर किंवा तूप टाका. बटर किंवा तूप टाकल्याने भाजीचा तिखटपणा कमी होतो.
भाजीमध्ये मसाला जास्त झाल्याने तुम्ही दह्याचा वापर करु शकता. दह्याच्या गोडसर पणामुळे भाजीचा तिखटपणा कमी होण्यास मदत होते.
बटाट्याची भाजी असेल तर, बटाटे वेगेळे उकडून घेवून थोडे पाणी टाकून त्यात मिक्स करा. तिखटपणा गायब होईल.
ग्रेव्हीवाल्या भाजीत टॉमेटो प्युरी मिक्स करुन तिखटपणा कमी करु शकता. टॉमेटोच्या प्युरीने भाजी आंबट गोड बनते.
पदार्थातील तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल देखील घालू शकता. नारळाच्या तेलामुळे तिखटपणा कमी होण्यासही मदत होईल
तिखट भाजीमध्ये मलई घातल्याने मिरचीचा तिखटपणा कमी होतो. मलईमध्ये चरबी असते, जी तिखटपणा कमी करण्यास मदत करते.