ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाजरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात फायबर, कॅल्शियम, लोह आणि प्रोटिन असल्यामुळे बाजरी ही पोषणमूल्यांनी भरलेली धान्य आहे.
बाजरीची भाकरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बाजरीची भाकरी हा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. हिवाळ्यात हि भाकरी शरीर गरम ठेवण्यास मदत करते आणि पचनासाठीही उत्तम मानली जाते.
बाजरीच्या पिठापासून आणि बेसन मिक्स करुन बनवलेले पिठले पौष्टिक आणि पचायला हलके असते. तुम्हाला हवे असल्यास पिठल्यात भाज्या घालून बनवल्यास चव आणखी वाढते.
बाजरीच्या पिठात कांदा, मिरची, कोथिंबीर मिसळून बनवलेले थालीपीठ सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.
बाजरीची खिचडी ही पचायला हलकी आणि पौष्टिक असते. बाजरी, मूग डाळ, हळद, जिरे व थोडे तूप वापरून बनवलेली ही खिचडी शरीराला गरम ठेवण्यास मदत करते.
बाजरी भिजवून वाटून बनवलेला डोसा हेल्दी आणि कुरकुरीत लागतो. नारळाच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता.
बाजरीचे पीठ भाजून गूळ, तूप आणि ड्रायफ्रुट घालून बनवलेले लाडू छान लागतात. बाजरीचे लाडू खाल्याने शरिराला ताकद मिळते.