Dhanshri Shintre
डोळ्यांची क्षमता सुधारण्यासाठी आहारात काही पोषक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, जे दृष्टीसाठी आणि शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
गाजरांमध्ये असलेला बीटा-कॅरोटीन शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होऊन डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी मदत करतो.
पालकात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मोतीबिंदू आणि वृद्धापकाळाशी संबंधित डोळ्यांच्या समस्या टाळण्यास मदत करतात.
सॅल्मन, ट्यूना आणि मॅकरेलसारख्या फॅटी मासांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यास मदत करतात.
काजू, बदाम आणि अक्ररोटसारखा सुका मेवा खाल्यास व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ मिळतात, ज्यामुळे मोतीबिंदूची समस्या कमी होते.
संत्री, लिंबू आणि हंगामी फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे शरीरासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
अंड्याच्या पिवळ्या भागात ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि व्हिटॅमिन ई असतात, जे वयानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना कमी करतात.
ब्रोकलीत व्हिटॅमिन A, C, E आणि ल्युटीन असतात, जे डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यास आणि दृष्टी सुधारण्यास मदत करतात.