Saam Tv
कोलेस्ट्रोलमुळे तुम्हाला हदयाचे रोग होऊ शकतात. म्हणून लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने तो टाळण्याचा प्रयत्न करतात.
काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय तुम्हाला या समस्येपासून दूर करू शकतात.
घरगुती उपायांमध्ये सगळ्यात जास्त दही वापरली जाते. त्यासोबत सब्जा मिक्स करून त्याचे सेवन केले जाते.
सब्जा खाल्याने तुमच्या शरीराला आवश्यक प्रमाणात फायबर मिळतात. त्याने अधिक वेळ पोट भरलेले सुद्धा राहते.
याशिवाय सब्जा हा तुमची हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो.
तुम्ही हे सेवन सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तिन्ही वेळेस करू शकता. इतकेच नाही तर पुढील पदार्थांचे सेवन सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
ओट्समध्ये सोल्युबल फायबर (Beta-glucan) भरपूर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
आवळा पावडर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो.
1 चमचा फ्लॅक्ससीड पावडर दहीत मिसळा. त्याने ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि फायबरने भरपूर, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात.