Saam Tv
पेरूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. या फायबरमुळे LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
पेरू रोज खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. आरोग्य सुधारते.
पेरूमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे आरोग्य मजबूत राहते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडायझेशन होत नाही. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होत नाही.
पेरूमध्ये कॅलरीज आणि फायबर जास्त असते. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित राहते.
शरीराला फायबरची गरज असेल तर ताजे गोड पेरू खावेत. पेरूचा रस पिण्यापेक्षा फळ चावून खावे यामुळे अधिक फायदा होईल.
या छोट्या गोड फळात व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, नियासिन, थायमिन , रिबोफ्लेविन, कॅरोटीन आणि लाइकोपीन यांसारखे अँटीऑक्सिडंट आणि कॅल्शियम, फॉस्फरस , आणि लोह भरपूर प्रमाणात असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.