Tanvi Pol
ज्या व्यक्तीला अंदमान या ठिकाणी पर्यटनासाठी जायचे आहे, त्याने सेल्युलर जेल नक्की पाहावे.
अंदमान-निकोबार बेटावर सेल्युलर जेल आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या सैनिकांना तुरूंगात ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी हे जेल बांधले होते.
या जेलचा उल्लेख होताच काळ्या पाण्याची शिक्षा हे तुम्हाला नक्की आठवेल.
मुंबईहून थेट अंदमानच्या पोर्ट ब्लेअर विमानतळावर फ्लाइट सुविधा उपलब्ध आहे.
विमानतळापासून अंदमान सेल्युलर जेल अंतर साधारण ४ ते ५ किमी आहे.
अंदमानला जाताना Entry Permit आवश्यक असते, जे विमानतळावर सहज मिळते.