Dhanshri Shintre
सकाळचा नाश्ता तुमच्या दिवसभराच्या ऊर्जा पातळीवर परिणाम करते, त्यामुळे ती नेहमी आरोग्यदायी असावी.
मुलांच्या आरोग्यासाठी सकाळची पौष्टिक नाश्ता अत्यावश्यक असते, ती त्यांचा विकास आणि ऊर्जा वाढवते.
शाळेत जाणाऱ्या मुलांनी अशा पौष्टिक गोष्टी नाश्त्यामध्ये घ्याव्यात ज्या त्यांना दिवसभर ताजेतवाने ठेवतील आणि ऊर्जा टिकवून ठेवतील.
सकाळी मुलांना ओट्स खायला दिल्यास फायदेशीर ठरते, कारण त्यात प्रथिने, फायबर, कॅलरीज आणि आवश्यक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
अंडी प्रथिने व पोषकतत्त्वांनी भरलेली असतात. उकडलेली, आमलेट किंवा भुर्जी, मुलांच्या आवडीनुसार विविध प्रकारे सहज तयार करता येतात.
दही हे आरोग्यासाठी उपयुक्त आहेच, पण त्यात बेरी मिसळल्यास ते मुलांसाठी अधिक पौष्टिक आणि परिपूर्ण सकाळच्या नाश्त्याचा पर्याय ठरतो.
नट्समध्ये असलेली भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे मुलांच्या शरीराला आवश्यक ऊर्जा देतात, त्यामुळे ते दिवसभर सक्रिय आणि ताजेतवाने राहतात.
एवोकॅडो हे चांगल्या चरब्यांनी समृद्ध फळ असून, ते मुलांचे पोट जास्त वेळ भरलेले ठेवते आणि त्यांना आवश्यक पोषणही मिळते.