Breakfast: काही मिनिटांत तयार होणारे पाच अस्सल मराठी ब्रेकफास्ट पर्याय, एकदा नक्की करून पाहा

Dhanshri Shintre

स्वादिष्ट खाद्य पदार्थ

महाराष्ट्रात विविध स्वादांचे खाद्य पदार्थ प्रसिद्ध असून, हे पारंपरिक पदार्थ राज्याची सांस्कृतिक आणि खाद्य परंपरा दर्शवतात.

पारंपरिक खाद्य

आज आपण महाराष्ट्रातील खास आणि लोकप्रिय पारंपरिक खाद्य पदार्थांची ओळख करून देणार आहोत, जे नक्कीच चविष्ट आहेत.

फराळी थालीपीठ

उपवासात खाल्ला जाणारा फराळी थालीपीठ हा ग्लुटेन फ्री पीठ, बटाटे आणि मसाल्यांनी तयार होणारा पौष्टिक पर्याय आहे.

नारळाच्या दुधात शेवया

नारळाच्या दुधात तयार होणाऱ्या शेवया हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ असून तो अनेक घरांमध्ये खास आवडीने खाल्ला जातो.

मिसळ पाव

अंकुरित मटकीपासून तयार होणारी मिसळ पाव ही लोकप्रिय पारंपरिक डिश असून, ती फरसाण, कांदा, लिंबाने अधिक चविष्ट होते.

बटाटा पोहा

बटाटा पोहा हा पारंपरिक नाश्ता असून, त्यात बटाटे, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता आणि मिरची वापरले जातात.

पुडाची वडी

पुडाची वडी हा लोकप्रिय महाराष्ट्रीयन नाश्ता असून, खोबरे, कोथिंबीर, मसाले आणि मिरची यांच्या सारणाने तयार केला जातो.

NEXT: १ महिना नाश्ता टाळला तर..., होतील हे धोकादायक परिणाम, वाचा सविस्तर

येथे क्लिक करा