Mosquito Protection: पावसाळ्यात डासांपासून बचाव कसा करावा? वाचा महत्त्वाच्या टिप्स

Dhanshri Shintre

डेंग्यू-मलेरिया

पावसाळ्यात डासांची संख्या वाढल्याने मुलं आणि वृद्धांना डेंग्यू-मलेरिया होण्याचा धोका वाढतो. या आजारांपासून बचावासाठी ही कथा शेवटपर्यंत पाहा.

क्रीम आणि स्प्रे

बाजारात पावसाळ्यासाठी डास प्रतिबंधक क्रीम आणि स्प्रे उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर केल्यास डासांपासून संरक्षण मिळते आणि आजारांचा धोका कमी होतो.

घरातील कोपरे स्वच्छ करा

पावसाळ्यात डास टाळण्यासाठी घरातील सर्व कोपरे आणि पाणी साचलेल्या ठिकाणे स्वच्छ ठेवा. यामुळे डासांची वाढ थांबेल आणि आजारांची शक्यता कमी होईल.

वनस्पती

काही वनस्पती डासांपासून संरक्षण देतात. पावसाळ्यात वाढत्या डासांपासून बचावासाठी अशा झाडांना घरात लावल्याने प्रभावी उपाय होतो.

मच्छरदाणी वापरा

मच्छरदाणी, इलेक्ट्रिक रॅकेटसह मच्छर नाशक उपकरणांचा वापर करा. यामुळे डास दूर होऊन तुम्हाला आजारांपासून संरक्षण आणि आराम मिळेल.

पूर्ण हाताचे कपडे वापरा

पावसाळ्यात डासांपासून बचावासाठी दिवसा-रात्री बाह्यांवर पूर्ण आच्छादन असलेले कपडे वापरा, ज्यामुळे डासांच्या चावण्यापासून प्रभावी संरक्षण मिळते.

NEXT: पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा

येथे क्लिक करा