Kitchen Hacks: पावसाळ्यात मीठ भिजण्यापासून संरक्षण कसे करावे? जाणून घ्या सोप्या उपाय

Dhanshri Shintre

मीठ

मीठ अन्नाची चव वाढवतेच, पण अति प्रमाणात वापरल्यास अन्नाचा स्वादही खराब करू शकते.

मीठ ओले होण्याचा धोका

पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे मीठ ओले होण्याचा धोका असतो, पण या टिप्सने मीठ कोरडे ठेवता येते.

तांदळाचे दाणे

मीठाच्या डब्ब्यामध्ये थोडे कच्चे तांदळाचे दाणे ठेवा, ते ओलावा शोषून मीठ कोरडे ठेवेल.

हवाबंद डब्यात ठेवा

मीठ हवाबंद डब्यात ठेवल्यास ओलावा लागणार नाही आणि त्याची चव दीर्घकाळ टिकेल.

तव्यावर भाजा

ओले झालेले मीठ तव्यावर हलक्या आचेवर भाजून थंड करा, नंतर व्यवस्थित साठवून पुन्हा वापरा.

झाकण स्वच्छ ठेवा

बॉक्सचे झाकण आणि बाहेरील भाग रोज स्वच्छ ठेवा, ज्यामुळे बाहेरील ओलावा आत जाणार नाही.

लवंग

मीठात लवंग ठेवल्यास ओलावा टाळता येतो आणि बुरशी होण्यापासूनही संरक्षण मिळते.

चहाच्या पिशव्या

कोरड्या चहाच्या पिशव्यांमध्ये मीठ ठेवल्यास ते ओलावा शोषून घेतं आणि मीठ कोरडं आणि ताजा राहतं.

NEXT: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

येथे क्लिक करा