Dhanshri Shintre
पावसाळ्यात मुलांना स्वच्छतेचे महत्त्व सोप्या भाषेत आणि कृतीतून कसे शिकवावे, याची योग्य पद्धत जाणून घ्या.
मुलांना शौचालय वापरल्यानंतर अँटी-बॅक्टेरियल साबणाने स्वच्छ हात धुण्याची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे.
अँटी-बॅक्टेरियल साबणाने आंघोळ केल्यास त्वचेवरील घाण व घाम सहज निघून जाऊन स्वच्छता राखली जाते.
नखांखाली जंतू साचतात, त्यामुळे मुलांना नियमित नखे स्वच्छ ठेवण्याची व वेळेवर कापण्याची सवय लावणे आवश्यक आहे.
मुलांना खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकण्यासाठी रूमाल किंवा हाताचा कोपर वापरण्याची सवय लावावी.
मुलं बाहेरून आल्यावर त्यांना हात-पाय स्वच्छ धुण्याची सवय लावा, जेणेकरून रोगजंतूंचा संसर्ग टाळता येईल.
पावसाळ्यात मलेरिया टाळण्यासाठी घरातील कुंड्या, टाक्या किंवा कोणतेही साचलेले पाणी नियमितपणे स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
पावसाळ्यात दूषित अन्न व पाणी टाळा आणि मुलांनाही स्वच्छ, घरचे अन्न खाण्याची सवय लावा.