Skincare Mistakes: दररोज आंघोळीनंतर 'या' चुका करता? थांबा! त्वचेला होतो गंभीर त्रास

Dhanshri Shintre

आरोग्यासाठी घातक

आंघोळीनंतर नकळत होणाऱ्या काही चुका आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, ज्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढते.

सामान्य चुका

आज आपण आंघोळीनंतर होणाऱ्या काही सामान्य पण नुकसानदायक चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

टॉवेलने जोरात घासू नका

आंघोळीनंतर चेहऱ्यावर टॉवेलने जोरात घासल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ही सवय टाळणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

मॉइश्चरायझर वापरु नका

आंघोळीनंतर रसायनयुक्त मॉइश्चरायझर वापरण्याची सवय काहींना असते, जी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते आणि विविध त्वचारोग निर्माण होऊ शकतात.

कोमट पाणी वापरा

आंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरल्यास त्वचा कोरडी व निस्तेज होऊ शकते, त्यामुळे नेहमी कोमट पाण्याचा वापर करणे योग्य ठरते.

कोणतेही साबण वापरु नका

साबणातील रसायने त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे आंघोळीवेळी नैसर्गिक पर्याय म्हणून मुलतानी माती वापरणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर आहे.

जेवल्यानंतर आंघोळ करु नका

जेवणानंतर त्वरित आंघोळ केल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो, ज्यामुळे पोटदुखी, अॅसिडिटी आणि अपचनासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

NEXT: उरलेली चहाची पावडर पुन्हा कशी वापरता येईल? जाणून घ्या उपयुक्त घरगुती ट्रिक्स

येथे क्लिक करा