Pneumonia: पावसात मुलं आणि वृद्धांचा न्यूमोनियापासून बचाव कसा कराल? फॉलो करा 'हे' नियम

Dhanshri Shintre

पावसात भिजल्यास कपडे बदला

पावसात भिजल्यानंतर ओले कपडे अंगावर ठेवणे आरोग्यासाठी घातक ठरते. लगेच कोरडे व गरम कपडे परिधान करा.

उबदार वातावरण ठेवा

घरामध्ये ओलसरपणा टाळा. रूम हीटर किंवा सुगंधी धुप वापरून हवामान कोरडे ठेवा.

पिण्याचे पाणी उकळून प्या

बॅक्टेरिया आणि विषाणूंपासून बचावासाठी पावसाळ्यात उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच वापरा.

इम्युनिटी वाढवणारे आहार

तुळस, हळद, आल्याचा काढा, विटॅमिन सी युक्त फळं (लिंबू, संत्रं) आणि झिंक युक्त अन्न सेवन करा.

थंड पदार्थ टाळा

थंड पाणी, आइस्क्रीम, फ्रीजमधील अन्न या काळात शक्यतो टाळावं. गळा दुखण्याचा धोका असतो.

स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या

हात, पाय नियमित धुवा. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा. खोकताना रुमालाचा वापर करा.

धूम्रपान व मद्यपान टाळा

धूम्रपान फुफ्फुसांची क्षमता कमी करतं आणि न्युमोनियाचा धोका वाढवतो. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

सर्दी, खोकला, ताप लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतः औषधोपचार करू नका. वेळेत तपासणी करून औषध सुरू केल्यास गुंतागुंत टाळता येते.

NEXT: किडनी स्टोनसाठी रामबाण उपाय! 'या' धान्याचे पाणी ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर

येथे क्लिक करा