Shruti Vilas Kadam
कारचा रंग पिग्मेंट (रंगकण),रेझिन (बाँडर्स),सॉल्व्हेंट्स (द्रावक) आणि ॲडिटिव्ह्ज या घटकांपासून बनवला जातो. याचे काम कारच्या पत्र्याला सुंदर लुक आणि गंज लागण्यापासून मजबूत संरक्षण करणे असते.
खूप जास्त वेळ वाहने उन्हात उभे करणे टाळावे. कारण सूर्यप्रकाशातील युव्ही किरणे रंगाच्या रेणूंना कमकुवत करतात आणि रंग हळूहळू फिकट होतो.
कार धुताना कधीही डिटर्जंट वापरू नका यामुळे रंगाचे नुकसान होते. उत्तम दर्जाच्या शॅम्पूचा वापर करावा, पुसताना नेहमी मऊसूत कापडाचा वापर करावा.
कार धुल्यानंतर वॅक्सचा वापर करणं फायदेशीर असतं. हा एक क्रीम लेयर असतो. जो कारच्या पेंटचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करतो.
कार धुवून झाल्यावर पॉलिशचा वापर करावा. अट्राव्हायोलेट यूव्ही प्रोटेक्शन हे पॉलिश वापरल्याने कारचा रंग टिकून राहतो आणि चमकही वाढते.
कारवरती झाडांची पाने किंवा पक्ष्यांनी घाण केली असेल तर जोरात न घासता मऊ कापडाचा वापर करावा. जोरात घासल्यामुळे कारवर स्क्रॅचेस पडण्याचा धोका असतो.
कारला नेहमी कव्हर करून ठेवावे. यामुळे कारचे धुळीपासून संरक्षण होईल. तसेच खराब हवामानातही पेंटचे नुकसान होणार नाही. वॉटरप्रूफ कव्हर वापरणे केव्हाही उत्तम.
वाहनावर असलेला ओलावा वेळोवेळी स्वच्छ करावा. कारण ओलावा किंवा दमटपणामुळे वाहनाला गंज लागण्याचा धोका अधिक असतो.