Saam Tv
पावसाळ्यात थंड वातावरणात अनेक आजार पसरत असतात. ताप, खोकला, सर्दी, थकवा ,अंगदुखी यांचा धोका पावसाळ्यात अधिक असतो. या वायरलच्या धोक्यांपासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे महत्त्वाचे असते.
रस्त्यांवर पाणी साचलेले असते. प्रवासात अनेक ठिकाणी इकडे - तिकडे हात लागतो. त्यामुळे बाहेरून आल्यावर सर्वात आधी हात पाय स्वच्छ धुवा. शक्य नसल्यास सॅनिटाइझरचा वापर करा.
पावसाळ्यात दुषित पाण्यातून अधिक संक्रमण होण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी साफ, स्वच्छ, उकळेले पाणी प्यावे. पावसाळ्यात डिहायड्रेशनचा धोका असतो म्हणून भरपूर पाणी प्या.
पावसात भिजल्यास त्वरित ओले कपडे बदलावे,केस कोरडे करावे . नाहीतर ताप , सर्दी, खोकला आणि ओलेपणामुळे त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
एकमेकांचे इंफेक्शन लागल्याने गर्दीच्या ठिकाणी वायरल हा लगेच पसरतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी राहणे शक्यतो टाळा
रस्त्यावरील उघड्यावरील अन्न , ज्यूस किंवा कापलेली फळे खाणे टाळा त्यामुळे फूड पाईझनचा धोका अधिक असतो.
पावसात पाणी साचल्यामुळे त्यात डासांचे प्रमाण वाढते. यांंमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार होऊ शकतात. डासांपासून वाचण्यासाठी क्रिम किंवा मच्छरदाणीचा वापर करा.
संसर्गाशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. आहारात व्हिटॅमिन सी आणि प्रथिनांनी युक्त पदार्थांचा, लिंबूवर्गीय फळे, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा समावेश करा
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.