Surabhi Jayashree Jagdish
रव्याचा डोसा हा आरोग्यदायी आणि चविष्ट नाश्ता मानला जातो. तो हलका असून पटकन बनतो. म्हणून अनेक घरांमध्ये तो आवडीने केला जातो.
कधी कधी डोसा बनवताना तो तव्याला चिकटतो. ही खूप सामान्य समस्या आहे. मात्र तो योग्य पद्धत न वापरल्याने चिकटतो.
जर डोसा चिटकण्याची कारणं समजली तर उपाय सोपे होतात. थोड्या टिप्स वापरून परफेक्ट डोसा बनवता येतो. यामुळे तो बनवण्याची पद्धत अधिक सोपी होते.
रव्याचं बॅटर खूप पातळ असेल तर डोसा पसरतो. यामुळे तो तव्यावर चिकटण्याची शक्यता वाढते. म्हणून बॅटर मध्यम घट्ट ठेवणं आवश्यक आहे.
तवा पुरेसा गरम नसेल तर डोसा चिकटतो. बॅटर टाकण्याआधी तवा गरम झाला आहे का ते पाहा. योग्य तापमानामुळे डोसा नीट सुटतो.
नॉन-स्टिक किंवा चांगल्या दर्जाचा तवा वापरणं फायदेशीर ठरते. यामुळे डोसा चिकटत नाही. स्वयंपाक करणंही सोपं होतं.
डोस टाकल्यावर लगेच पलटू नका. तो थोडा सेट होऊ द्या आणि बाजूंना थोडं तेल टाका. यामुळे डोसा सहजपणे तव्यावरून निघतो.